जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस निमित्त.

अशी कल्पना करा की , तुम्ही एका टीव्ही शोरूम मध्ये आहात. हजारो टीव्ही आहेत, सर्वच्या सर्व फुल्ल आवाजात आणि वेगवेगळ्या चॅनेल वर लावलेले आहेत. आता त्यातल्या एका टीव्हीवर लक्ष केंद्रित करून दाखवा. कल्पना सुद्धा अवघड वाटते ना ? अगदी असेच असते स्किझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तीचे रोजचे आयुष्य. त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टी महत्वाच्या वाटतात, त्यांच्या मेंदूला ही सगळी पंचेंद्रियांकडून येणारी माहिती व्यवस्थित हाताळता येत नाही आणि त्यामुळे कुठलाही ठाम निर्णय घेता येत नाही. त्यामुळेच या व्यक्ती वेगळ्या पद्धतीने वागतात, विचार करतात आणि तसेच बोलतात सुद्धा, कधीकधी याचा संदर्भ त्यांच्या घरच्यांना सुद्धा लावता येत नाही, आणि काय त्रास होतोय हे त्या व्यक्तीला स्वतःला सुद्धा सांगता येत नाही. चला तर थोडक्यात जाणून घेऊया, या आजाराविषयी.
– डॉ. मुक्तेश दौंड.

सर्वांसाठी

1) स्किझोफ्रेनिया हा एक मेंदूचा अत्यंत गुंतागुंतीचा आणि दीर्घकाळ चालणारा आजार आहे.

2) दर एक लाख लोकसंख्येमागे एक हजार लोकांना हा आजार होतो.

3) स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित- अशिक्षित, शहरातले- गावाकडचे कोणालाही हा आजार होऊ शकतो.

4) भावना, विचार आणि वर्तन या माणसाला माणूसपण देणाऱ्या गोष्टींवरतीच हा आजार परिणाम करतो. भास होणे, भ्रम तयार होणे, वागण्या बोलण्यातली सुसुत्रता हरवणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.

5) जागतिक स्तरावर, स्किझोफ्रेनिया मुळे रुग्णांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षमतेवर प्रचंड प्रभाव पडतो. असे रुग्ण बऱ्याचवेळा त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडू शकत नाहीत.

6) हृदयाचे, साथीचे आणि चयापचयाचे आजार यांच्या मध्ये जास्त प्रमाणात होतात. या चांगला उपचार उपलब्ध असलेल्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही मंडळी सर्वसामान्यांपेक्षा सरासरी पंधरा वर्षे कमी आयुष्य जगतात. हे बदलायला हवे.

7) मानसिक आजाराचा कलंक त्यामुळे समाजात होणारी हेळसांड आणि त्यांच्या मानवी मुल्यांचे हनन. या गोष्टी बदलायला हव्यात आणि या आजाराविषयी जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून आजचा जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस.

8) स्किझोफ्रेनियाला उपचार आहे तो बरा होऊ शकतो आणि काही रुग्णांमध्ये कंट्रोल होतो. पण उपचारांनी आयुष्य बदललेली हजारो उदाहरणे आहेत आम्हां मनोविकारतज्ज्ञांकडे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच आणि सातत्याने केलेला उपचार त्या कुटुंबाचे स्वास्थ्य बदलावणारा असतो.

नातेवाईकांसाठी

1) वेळीच केलेली मदत आणि उपचार हे रुग्णाचे आयुष्य बदलतात . हा आजार आहे त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट घेण्यामध्ये आणि ट्रीटमेंटमध्ये टिकून राहण्यामध्ये मदत करा.

2) त्यांना येणाऱ्या इतरांवरच्या शंका आणि होणारे भास हे त्यांच्यासाठी अगदी खरेखुरे असतात त्यामुळे ते खोटे आहे म्हणून त्यांना दडपून टाकू नका, अशाने आजार वाढत जातो.

3) त्यांना समजुन घेण्याचा प्रयत्न करा, एखाद्या घटनेकडे ते त्यांच्या आजारामुळे वेगळ्या पद्धतीने पाहू शकतात , हे मान्य करा.

4) त्यांचा सन्मान करा, मदत करा आणि काळजी देखील घ्या. हे करताना स्वतःकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे आणि आयुष्याकडे दुर्लक्ष मात्र करू नका.

5) आजाराची माहिती घ्या, डॉक्टरांना जेव्हा भेटता तेव्हा तुमचे प्रश्न विचारून घ्या.

To People who search Online about Schizophrenia.

1) It’s really jargon many times you get on the internet. Please note information is not knowledge.

2) Schizophrenia is really a complex brain disorder, with many hypotheses about its causation, hence more stigma and misunderstanding prevails.

3) Schizophrenia doesn’t mean split personality or multiple personality disorder.

4) The projections on searches about violence by people having Mental illness, Schizophrenia per say are not true. Rather violence is more common in the general population.

5) Limited resources are reality all over the world particularly in the field of mental health. Which leads to a huge treatment gap giving false impression that mental health conditions are not treatable.

6) Most people with Schizophrenia stay with family and have a meaningful life than projected in the media.