Imformative Post
#Focus on things within your control. Avoid #worrying about things beyond your control.#Mantra for a confident and #peaceful#life.#share#mentalhealth#mentalhealthawareness#mentalhealthmatters
#Focus on things within your control. Avoid #worrying about things beyond your control.#Mantra for a confident and #peaceful#life.#share#mentalhealth#mentalhealthawareness#mentalhealthmatters
स्वत्व हरवताना जागतिक अल्झायमर दिवसाच्या निमित्ताने. आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा ठेवा म्हणजे आपल्या आठवणी. आपल्या जडण-घडणे पासून अगदी शेवटपर्यंत अगदी आपल्या हक्काची गोष्ट असतात त्या. चांगल्या-वाईट, हसऱ्या-दुखऱ्या, नवीन-जुन्या, हव्या असलेल्या- नको असलेल्या अगदी कशा ही असल्या तरी जपलेल्या आणि म्हणूनच आपले स्वत्व बनलेल्या. माझ्या मते आपण कोण असतो तर “आपण आपल्या आठवणींचा संग्रह असतो.” पण अशा या आठवणींना घरघर लागली तर ? आहेत त्या आठवणी पुसट होत चालल्या आणि नवीन आठवणी तयारच करता नाही आल्या तर ? आपलेच घर आपल्याला रोज अनोळखी [...]
२४ मे जागतिक स्किझोफ्रेनिया दिवसानिमित्त. आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच घटना घडत असतात, ज्या चुकीच्या असतात हे कुठेतरी कळते पण त्यामध्ये अधिक लक्ष देऊन ते जाणुन घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेळ नसतो किंवा आपला पूर्वग्रह आपल्याला अशा गोष्टी समजुन घेण्याला आडवा येतो. माणसाच्या वागणुकीत होणारा बदल ही देखील अशीच एक गोष्ट. अचानक किंवा बऱ्याच वेळा हळू हळू एखाद्याच्या वर्तणुकीत होत जाणारा बदल हा नक्कीच कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच तर लेखनामध्ये, सिनेमा मध्ये [...]
डॉ. मुक्तेश दौंड, मनोविकारतज्ज्ञ, निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड, नाशिक. सध्याच्या काळात दोनच गोष्टी मिडियामध्ये जास्त प्रमाणात दाखवल्या जात आहेत. त्या म्हणजे करोना (Corona) आणि आत्महत्या! (Suicide) बऱ्याच घरांत पालकांनी तेच-तेच पाहिल्यामुळे लहान मुलेदेखील आता विचारतात, ‘बाबा, आत्महत्या म्हणजे काय हो ?’ इतका हा शब्द रुळला आहे, पण माहिती असणे आणि समजणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्महत्या हा विषय लोकांना किती समजला आहे हा मोठा प्रश्न आहे. मिडिया या गोष्टींचे अतिरंजित आणि बऱ्याचवेळा चुकीचे सादरीकरण करतो आणि आपण सगळे ते पाहून लहान [...]
१) सतत पॉझीटीव्ह : कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं! उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो. आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात. २) प्रेमात पडा : आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण [...]