स्वत्व हरवताना
स्वत्व हरवताना जागतिक अल्झायमर दिवसाच्या निमित्ताने. आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा ठेवा म्हणजे आपल्या आठवणी. आपल्या जडण-घडणे पासून अगदी शेवटपर्यंत अगदी आपल्या हक्काची गोष्ट असतात त्या. चांगल्या-वाईट, हसऱ्या-दुखऱ्या, नवीन-जुन्या, हव्या असलेल्या- नको असलेल्या अगदी कशा ही असल्या तरी जपलेल्या आणि म्हणूनच आपले स्वत्व बनलेल्या. माझ्या मते आपण कोण असतो तर “आपण आपल्या आठवणींचा संग्रह असतो.” पण अशा या आठवणींना घरघर लागली तर ? आहेत त्या आठवणी पुसट होत चालल्या आणि नवीन आठवणी तयारच करता नाही आल्या तर ? आपलेच घर आपल्याला रोज अनोळखी [...]