आत्महत्या रोखूया
डॉ. मुक्तेश दौंड, मनोविकारतज्ज्ञ, निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड, नाशिक. सध्याच्या काळात दोनच गोष्टी मिडियामध्ये जास्त प्रमाणात दाखवल्या जात आहेत. त्या म्हणजे करोना (Corona) आणि आत्महत्या! (Suicide) बऱ्याच घरांत पालकांनी तेच-तेच पाहिल्यामुळे लहान मुलेदेखील आता विचारतात, ‘बाबा, आत्महत्या म्हणजे काय हो ?’ इतका हा शब्द रुळला आहे, पण माहिती असणे आणि समजणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्महत्या हा विषय लोकांना किती समजला आहे हा मोठा प्रश्न आहे. मिडिया या गोष्टींचे अतिरंजित आणि बऱ्याचवेळा चुकीचे सादरीकरण करतो आणि आपण सगळे ते पाहून लहान [...]