जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस निमित्त
अशी कल्पना करा की , तुम्ही एका टीव्ही शोरूम मध्ये आहात. हजारो टीव्ही आहेत, सर्वच्या सर्व फुल्ल आवाजात आणि वेगवेगळ्या चॅनेल वर लावलेले आहेत. आता त्यातल्या एका टीव्हीवर लक्ष केंद्रित करून दाखवा. कल्पना सुद्धा अवघड वाटते ना ? अगदी असेच असते स्किझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तीचे रोजचे आयुष्य. त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टी महत्वाच्या वाटतात, त्यांच्या मेंदूला ही सगळी पंचेंद्रियांकडून येणारी माहिती व्यवस्थित हाताळता येत नाही आणि त्यामुळे कुठलाही ठाम निर्णय घेता येत नाही. त्यामुळेच या व्यक्ती वेगळ्या पद्धतीने वागतात, विचार [...]