दारू पिणाऱ्या चे लिव्हर जर डॉक्टरांशी बोलू लागले तर!!! ( When Liver Talks to Deaddiction specialist )
दारू पिणाऱ्या चे लिव्हर जर डॉक्टरांशी बोलू लागले तर!!! नेहमीसारखे दारू पिणाऱ्या व्यक्तींबरोबर व्यसनमुक्तीचे काम करत असताना वरील विचार डोक्यात चमकून गेला. लिव्हर आणि डॉक्टर यांमधील संवाद असा काहीसा असेल. लिव्हर : “ओ डॉक्टर सांगाना याला, तुझा खेळ होतो म्हणा पण माझा जीव जातो.” डॉक्टर : “अरे हो रे बाबा! कळतय मला तुझे दुःख, चल आज तू लिव्हर आणि मी डॉक्टर आपण दोघे मिळून प्रयत्न करूया.” लिव्हर : “खरंच कळत नाहीये का याला ? अशीच शंका येतेय मला सगळ्यात आधी.” डॉक्टर : “नाही रे बाबा, [...]
