माणूसपण हिरावणारा आजार (Psychosis)
आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच घटना घडत असतात, ज्या चुकीच्या असतात हे कुठेतरी कळते पण त्यामध्ये अधिक लक्ष देऊन ते जाणुन घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेळ नसतो किंवा आपला पूर्वग्रह आपल्या समजुन घेण्याला आडवा येतो. माणसाच्या वागणुकीत होणारा बदल ही देखील अशीच एक गोष्ट. अचानक किंवा बऱ्याच वेळा हळू हळू एखाद्याच्या वर्तणुकीत होत जाणारा बदल हा नक्कीच कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच तर लेखनामध्ये, सिनेमा मध्ये आणि समाजामध्ये या गोष्टी वारंवार चर्चिल्या जातात, अर्थात फक्त उथळ मनोरंजनाच्या दृष्टीने. खुपच थोडे [...]