drmukteshdaund

सृजन

सृजन

मनाच्या आरोग्याविषयी, मराठीत

आत्ता मदत हवी असेल तर लगेच फोन करा

टेली-मानस १४४१६  ·  तातडीचा धोका असेल तर ११२

मदतीचे पान वाचा

हे काय आहे?

इंटेरनेटवर मराठीत मानसिक आरोग्याविषयी नीट, विश्वासार्ह आणि वैज्ञानिक दृष्ट्या योग्य माहिती फारशी सापडत नाही.

जे सापडतं ते बहुतेक इंग्रजीचं यांत्रिक भाषांतर असतं. नाहीतर कुठल्यातरी केंद्राची जाहिरात. डॉक्टरांच्या खोलीत जे प्रत्यक्ष सांगितलं जातं, ते मराठीत लिहिलेलं फार क्वचितच मिळतं.

सृजन हा आमचा तोच मानसिक आरोग्य आणि आजारविषयीच्या माहितीचा  गॅप भरून काढायचा एक  प्रामाणिक  प्रयत्न आहे.

इथले लेख इंग्रजीतून भाषांतरित केलेले नाहीत. ते मराठीत, मराठी वाचणाऱ्या माणसासाठी, नव्याने लिहिलेले आहेत. कारण भाषांतरात नेमकं तेच हरवतं, ज्या शब्दांत घरात बोललं जातं, तेच.

कोण लिहितं?

•डॉ. मुक्तेश दौंड — सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ, नाशिक

डॉ. मुक्तेश दौंड

MBBS, DNB (मानसोपचार). नाशिकमध्ये २०१६ पासून सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ. व्यसनमुक्ती उपचारांमध्ये विशेष काम.

•डॉ. अनिता दौंड — बाल व किशोरवयीन मानसोपचारतज्ज्ञ

डॉ. अनिता दौंड

MBBS, MD (मानसोपचार), बाल व किशोरवयीन मानसोपचारात पोस्ट-डॉक्टोरल फेलोशिप. मुलं आणि पालकांविषयीचे लेख त्या लिहितात.

इथे काय सापडेल?

  • मदत आत्ता — तातडीच्या वेळी काय करावं.
  • व्यसनमुक्ती — दारू, तंबाखू, गुटखा आणि इतर.
  • कुटुंब आणि काळजी — घरातल्या माणसासाठी.
  • मुलं आणि पालक.
  • उपचार आणि औषधं — काय, कशासाठी, किती काळ.
  • कायदा आणि हक्क — मानसिक आरोग्य सेवा कायदा २०१७.
  • शब्दकोश — डॉक्टर वापरतात ते इंग्रजी शब्द, मराठीत.
  • लेखमाला — श्रावणधारा आणि इतर..

इथे काय मिळणार नाही

हे सांगणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं.

  • तुमचं निदान. लेख वाचून स्वतःचं किंवा घरातल्या कुणाचं निदान करता येत नाही. ते समोरासमोर बसूनच होतं.
  • तुमचं निदान. लेख वाचून स्वतःचं किंवा घरातल्या कुणाचं निदान करता येत नाही. ते समोरासमोर बसूनच होतं.
  • झटपट उपाय. “सात दिवसांत नैराश्य घालवा” असलं इथे काही नाही.
  • कुठल्याही औषधाचं नाव किंवा मात्रा.
  • रुग्णांचे अनुभव किंवा प्रशस्तिपत्रं. लेखांतले प्रसंग काल्पनिक असतात आणि तसं स्पष्ट लिहिलेलं असतं.
  • तुमची कुठलीही माहिती. इथे नोंदणी नाही, फॉर्म नाही, ईमेल मागितला जात नाही. वाचा आणि जा.
  •  

वाचून काय करावं ?

मराठीत हे लिहिण्याचं एकच कारण आहे — घरातल्या ज्या माणसाला इंग्रजी वाचायला जड जातं, त्याच्यापर्यंत ते पोहोचावं. काका, आजी, गावाकडचा भाऊ. लिंक पाठवणं सोपं आहे, आणि बऱ्याचदा तेवढंच पुरतं.

सूचना

इथले सर्व लेख माहितीसाठी आहेत. तो वैद्यकीय सल्ला नाही आणि प्रत्यक्ष तपासणीची जागा घेऊ शकत नाही. त्रास होत असेल तर पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. तातडीच्या परिस्थितीत १४४१६ किंवा ११२ वर फोन करा.

Scroll to Top