पेशंटच्या गोष्टी डॉक्टरांच्या शब्दात ( Odd case of psychiatry )

पेशंटच्या गोष्टी डॉक्टरांच्या शब्दात ( Odd case of psychiatry )

               आज एक पेशंट आला, थोडा दचकत तो खुर्ची वर बसला. मनात तर सांगायच आहे सगळ आधी पासून, पण तरी हिंमत होत नव्हती म्हणून अशक्त वाटतय, हात कापतात, झोप येत नाही अशा तक्रारी सुरू होत्या… बर मी मानसरोग तञ म्हणजे मानस शास्रात निपून, म्हणून त्याच्या मनातला गोंधळ कळला मला पण नेमक तो काय लपवतोय हे माञ समजत नव्हत…

               आता माझी उत्सुकता वाढत चालली होती. तरी मी त्याला शांत होण्याची वाट पाहत होते. इकडच तिकडच बोलल्यावर आणि त्यात जरा वेळ गेल्यावर त्याला आत्मविश्वास येईल हे माहित होत. तसेही तो जे सांगत होता ती त्याचा आजीराची लक्षणे असू शकतात हे मला नोट करून घ्याव लागतच. मग आरामात त्याने तो विषय काढला…

               डॉक्टर मला बऱ्याच दिवसा पासून एक फार विचीञ जाणवतं. मला मरायच नाही तरिपण मला चाकू दिसला की स्वतः ला मारुन घ्यावास वाटतं. रेल्वे दिसली की रुळावर जावून जीव द्यावा अस वाटतं. मी खूप जनांना सांगायचा प्रयत्न केला पण कोणिच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. सगळे मला वेड्यात काढतात, पण डॉक्टर मी वेडा नाही. मला सगळ समजतं, मी सगळा व्यव्हार कामं सगळ बरोबर करतो, आणि मला माहिती आहे की हे जे मला अस्वस्थ करणारे विचार येतात ते चुकिचे आहेत. मी खूप डॉक्टरांना दाखवले पण कोणिच मला समजू शकल नाही. माझीच समजूत काढून मला म्हणायचे की हे तुझे भास असतिल. मग मी पुढे कोणत्याच डॉक्टरला सांगायच नाही अस ठरवलं. मीच माझा विचार करत दिवसभर पडून रहायचो की खरंच हे भास तर नाही..?पण नाही हे भास नाही, सत्य आहे. मला खरंच मरण्याचे विचार येतात आणि मी काही पण केलं तरी ते थांबवू शकत नाही. मी तुम्हाला सांगू शकलो कारण तुम्ही माझी सगळी बडबड शांत पणे ऐकूण घेतलीत. डॉक्टर सांगाना मी वेडा तर नाहीना झालो…?

               पेशंट जेव्हा अस मनमोकळे पणाने सगळं सांगतात, आणि विचारतात की मी वेडा तर नाही, तेव्हा त्यांना तो वेडा नाही हेच ऊत्तर पाहिजे असतं. अशा वेळी डॉक्टर माञ पेचात पडतो की खरं सांगाव तर पेशंटचा अस्वस्थपणा आणखी वाढेल, आणि न सांगाव तर हा इलाज करून घेण्यात दर्लक्ष करेल …

               मी सांगितले की हे लक्षणे म्हणजे मानसिक आजाराची पहिली पायरी आहे. तुम्ही जर वेळेत इलाज केला तर पुर्ण बरे होऊ शकता.. आणि गोळ्या औषधांसोबत तुम्हाला तुमच्या रोजच्या सवयिंमधे काही बदल करावे लागतिल.
जसे, आहार योग्य आणि वेळेवर घेणे. रोज सकाळी ऊठून व्यायाम, योगासन,ध्यान करणे. व औषधी वेळेवर न चुकता घेणे…

               मानसिक आजार हा इतर आजारां सारखाच असतो. जसे मधूमेह, रक्तदाब (बीपी) हे आजार औषधांनी बरे होतात तसेच मानसिक आजार योग्य वेळेत उपचार केल्याने बरा होतो…

मानसिक आजारांना घाबरू नका.. त्याबद्दल समाजात भीती पसरवू नका. तर जनजागृती करा..

जगा आणि जगण्याला प्रोत्साहन द्या…
मानसिक रोगाची शंका आल्याबरोबर मानस रोग तञा कडून तपासणी करून घ्या…