कालाय तस्मै नमः (कोरोना आणि आपण)
असे नाव देण्याचे कारण, काळ (वेळ) हि निसर्गातील अशी गोष्ट आहे, जी कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या अस्तित्वाची किंमत दाखवून देते. खरेतर माणसांची लायकी दाखवुन देते म्हणा ना हवे तर. स्वतः ला उत्क्रांतीच्या सप्तसोपानावर आरूढ समजणाऱ्या मानवाला निसर्गाने दिलेली कोरोनारुपी चपराक आहे ही. माणसाच्या आयुष्याकडे पाहण्याच्या संकल्पना ज्यामुळे बदलतात त्यामध्ये साथींच्या आजारांचा सिंहाचा वाटा आहे, पण हे क्षेत्र खुपच दुर्लक्षित आहे. इतिहासामध्ये मानवाच्या प्रगती मध्ये जी मोठी आणि अनपेक्षित वळणं आली आहेत त्यातली बरीचशी साथींच्या आजारामुळे आहेत. उदा. युद्धाचे [...]
