WORLD MENTAL HEALTH DAY

WORLD MENTAL HEALTH DAY

आज 10 ऑक्टोबर म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. मानसिक आरोग्याचा प्रचार आणि प्रसार हा याचा मुळ उद्देश.

माझ्यासारख्या मनोविकारतज्ञाला भेटणारे सर्वच म्हणतात की आजकाल तुम्हां सायकियाट्रिस्ट लोकांची खूप गरज आहे.

पण जेव्हा खरंच गरज असते तेव्हा आपण काय करतो ?
जेव्हा आपल्या घरातील कोणाला, मित्राला, शेजाऱ्याला जेव्हा सायकियाट्रिस्ट कडे घेऊन जातात, त्यानंतर आपण त्यांच्याशी कसे वागतो ?
जेव्हा त्या व्यक्तीला आपल्या मदतीची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा आपण काय करतो ?
दुसऱ्याचे सोडा, जेव्हा आपले नेहमीचे डॉक्टर आपल्याला सायकियाट्रिस्ट ला भेटण्याचा सल्ला देतात, तेव्हा आपण काय करतो ?

या वरील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधण्यासाठी आणि त्यानुसार वागण्याची जाणीव करून देण्यासाठी आजचा दिवस.
चला आपण सगळे मिळून हा कलंक दूर करण्यामध्ये आप आपला खारीचा वाटा उचलूया.

“Mental Health Promotion and Suicide Prevention” World Mental Health Day 2019.
यावर्षी आत्महत्या हा विषय प्रामुख्याने चर्चिला जाणार आहे.

डॉ. मुक्तेश दौंड
मनोविकारतज्ञ,
निम्स हॉस्पिटल,
नाशिक.