वैचारिकतेचा विचार करताना
ते शास्त्र असते. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला जर ती पटवून द्यायची असेल तर ‘शास्त्र’ हा शब्द तिला जोडून द्यायचा, काम झालेच म्हणून समजा. कारण एकमेव भारतातील शास्त्र हे असे आहे की त्याच्या चिकित्सेला परवानगी नाही. असे केल्याने शास्राचा अपमान होतो, हे पण शास्रातच लिहिलेले आहे म्हणे. उदाहरण द्यायची गरज नाही ज्याने त्याने आप आपल्या आजूबाजूला थोडेसे चिकित्सेने पाहिले तरी बरीच उदाहरणे दिसतील. तर अश्या संस्कारांमध्ये वाढलेल्या मुलांनी पुढे जाऊन स्वतःच वैचारिक दृष्टिकोन (Critical Thinking) शिकावा अशी आपली अपेक्षा आहे. जी की [...]
